महिला उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र महिला
आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम
तुमच्या स्टार्टअपचे शाश्वत व्यवसायात रूपांतर करण्यासाठी
अर्ज करण्याची अंतिम मुदत: 25 फेब्रुवारी 2022
संकल्प प्रकल्पद्वारे प्रायोजित प्रारंभिक टप्यातील महिला उद्योजकांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठीचा , कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे चालविण्यात येणारा उपक्रम
आमच्याविषयी
“महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम” हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी एक विशेष उपक्रम आहे, ज्यामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या नवीन व्यवसायाचे सक्षम व शास्वत उद्योगात रूपांतर करता येईल. हा कार्यक्रम सुरुवातीच्या टप्प्यातील उपक्रमांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढविण्यासाठी तयार केलाला आहे, ज्यामध्ये त्यांना उद्योजकीय कौशल्ये, त्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाईल आणि कार्यक्रम संपल्यानंतरच्या मदतीसाठी स्थानिक महिलांचे नेटवर्क तयार केले जाणार आहे. या उपक्रमाद्वारे महिला उद्योजकांना आवश्यक ते पाठबळ पुरवून राज्याच्या शास्वत विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचा “महिला उद्योजकता कक्ष, अमेरिकी दूतावास व अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्च” (ACIR) यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम” राबविण्याचे नियोजित केले आहे. महाराष्ट्र राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच त्या संबंधीचे नियोजन आणि उपक्रम हाती घेण्याच्या उद्दिष्टाने महिला उद्योजकता कक्षाची स्थापना करण्यात आली. हा कक्ष सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने कार्य करतो आणि महिला उद्योजक आणि भागीदार संस्थांमध्ये सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यास मदत करतो तसेच महिला उद्योजकतेसाठी पूरक धोरण तयार करण्याचे काम करतो. हा कक्ष राज्यातील महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतो आणि महिलांना उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतो. महिला उद्योजकता कक्षाने महिला उद्योजकांना समर्थन देण्यासाठी विविध उपक्रमांची योजना आखली आहे ज्यामध्ये मार्गदर्शन आणि इनक्युबेशन समर्थन, आर्थिक सहाय्य आणि अनुपालन समर्थन यासारखे विविध उपक्रम आहेत.
“महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम” या उपक्रमात भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधील महिला उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.
फायदे
फायदे
ठळक उद्दिष्टे व फायदे
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी द्वारे प्रायोजित.
अग्रगण्य महिला
उद्योजकांकडून मार्गदर्शन
सर्वोत्तम ६ प्रतिभागींना
Nexus इनक्युबेशन कार्यक्रमामध्ये
इनक्यूबेट होण्याची संधी
सहयोग
मजबूत स्थानिक नेटवर्क
समवयस्क उद्योजकांकडून
मार्गदर्शन
कार्यक्रमाची रचना
ACIR च्या ऑनलाइन स्टार्टअप लॉंच कार्यक्रमासाठी 120 महिला उद्योजकांची निवड केली जाईल. हा कार्यक्रम सुरुवातीच्या टप्यातील उयोजकांकरीत तयार केलेला आहे. या ऑनलाइन कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून स्टार्टअप लॉंच करणे व यशस्वीरीत्या चालवणे याविषयीचे मार्गदर्शन केले जाईल.
60 उद्योजकांना 1 दिवशीय ऑनलाइन कार्यशाळेसाठी निवडले जाईल ज्यामध्ये त्यांना शास्वत व्यवसाय निर्माण करण्यासाठीचे मार्गदर्शन केले जाईल.
निवडक 30 उद्योजकांना 2 दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेत निमंत्रित केले जाईल जेथे त्यांना उद्योजकतेविषयीचे सखोल प्रशिक्षण दिले जाईल. यापुढे, सर्वोत्कृष्ट 6 उद्योजकांना Nexus प्री-इनक्यूबेशन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
पात्रता निकष
01
फक्त महिला उद्योजक अर्ज करण्यास पात्र.
02
अर्जदार ही नाविन्यपूर्ण उपक्रम/स्टार्टअपची संस्थापक किंवा सह-संस्थापक असावी
03
अर्जदारांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे
०४
सहभागींना इंग्रजीचे कार्य ज्ञान असणे आवश्यक आहे कारण सर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्ग इंग्रजीमध्ये असतील.
05
अर्जदार भारतीय नागरिक आणि महाराष्ट्र निवासी असणे आवश्यक आहे.
निवडीसाठीचे निकष
हा कार्यक्रम महाराष्ट्रातील महिला उद्योजकांसाठी आहे.
एकदिवसीय कार्यशाळेसाठी स्टार्टअप अर्जदारांची निवड खालील निकषांचा वापर करून केली जाईल:
-
प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट (POC) च्या टप्प्यावर असलेल्या स्टार्टअप्स / व्यवसायांना प्राधान्य दिले जाईल.
-
संबंधित प्रदेशातील समस्येची प्रासंगिकता
-
स्टार्टअप / व्यवसायामध्ये एक महिला संस्थापक/सह-संस्थापक असणे आवश्यक आहे
Frequently Asked Questions
प्र. अर्ज कसा करावा ?
उ. अर्ज करण्यासाठी कृपया हा ऑनलाइन फॉर्म भरावा
प्र. माझी निवड झाली आहे की नाही हे मला कसे कळेल?
उ. आपण निवडल्यास आपल्याला १ मार्च २०२२ पर्यंत आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईमेलद्वारे माहिती दिली जाईल.
प्र. या कार्यक्रमासाठी काही शुल्क आहे का?
उ. नाही. हा कार्यक्रम पूर्णतः अनुदानित आहे.
प्र. अधिक माहितीसाठी मी कोठे पोहोचू शकतो?
उ. अधिक माहितीसाठी कृपया malika@startupnexus.in आणि ruchi@msins.in येथे संपर्क साधा
प्र. ऑनलाईन कार्यशाळांसाठी कोणते व्यासपीठ वापरले जाईल?
उ. सर्व कार्यशाळा झूमवर आयोजित केल्या जातील, कार्यशाळेत सामील होण्यासाठी आपल्याला एक दुवा मिळेल. झूमवरील मीटिंग्जमध्ये कसे सामील व्हायचे ते जाणून घ्या हे छोटे व्हिडिओ पाहा - मराठी ट्यूटोरियल | इंग्लिश ट्यूटोरियल
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा malika@startupnexus.in
प्र. कार्यशाळेसाठी निवड निकष काय आहेत?
उ. दोन दिवसांच्या कार्यशाळेसाठी खालील निकषांचा वापर केला जाईल:
-
स्टार्टअप्स / महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांमध्ये नाविन्यपूर्ण प्रक्रिया किंवा उत्पादने असणे आवश्यक आहे.
-
बौद्धिक संपदा हक्क असणे किंवा त्यांच्या संरक्षणाची योजना असणे आवश्यक.
-
इंग्रजी भाषेत लिहिता व बोलता येणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीबद्दल
महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था ही महाराष्ट्र राज्यातील नवनिर्मितीवर आधारित उद्योजकीय परिसंस्थेला चालना देणारी प्रमुख सरकारी संस्था आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत स्थापन झालेल्या या सोसायटीचे ध्येय नावीन्यपूर्ण दृष्टिकोन जोपासणे आणि महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण व्यवसाय चालविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हे आहे.
फेब्रुवारी 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 नुसार, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची टीम स्टार्टअप परिसंस्थेलाला सर्व स्तरांवर समर्थन देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे.
भागीदार
Sankalp
ACIR बद्दल
अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्च (ACIR) ही एक अमेरिकन, 501 (सी) (3) संस्था आहे जी नाविन्यता, इनक्यूबेशन आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये सल्ला, प्रशिक्षण आणि व्यवस्थापन सेवा प्रदान करते.
ACIR ने दक्षिण कोरिया, कझाकस्तान, रशिया, जॉर्जिया आणि अमेरिकेसह जगभरात उद्योजकता कार्यक्रम यशस्वीरित्या चालविले आहेत, सर्वात नवीन दिल्ली, भारत (www.startupnexus.in) येथील नेक्सस इनक्यूबेटर आणि स्टार्टअप हब आहे.